मराठा समाजाला ओबीसींमध्ये घेतल्यास आम्ही आंदोलन करू : डॉ. बबनराव तायवाडे

06 Sep 2023 11:42:05
 
Dr. Babanrao Taiwade
 
 
मुंबई : जालन्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्याची मागणी पुढे येत आहे. तर त्यास अनेकांचा विरोध ही आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही या मागणीला विरोध केला आहे. तसेच, मराठा समाजाला ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही आंदोलन करू. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
 
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "आमचा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध आहे. त्यांना ओबीसींमध्ये घेऊ नये. तसेच त्यांना ओबीसींची प्रमाणपत्रेही देऊ नये. नाही तर आम्ही देशभर आंदोलन छेडू. जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन करू. सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही." असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0