मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे.
"उदयनिधी स्टॅलिन यांनी काहीही चुकीचे बोलले नाहीत". असे विधान प्रियांक खर्गे यांनी केले आहे. उदयनिधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे. देशभरातील २६२ माजी नोकरशहांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.