नक्षली कारवायांविरोधात एनआयएची छापेमारी

05 Sep 2023 19:36:54
NIA raids five districts of Uttar Pradesh in Naxal case

नवी दिल्ली
: राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी (एनआयए) माकप – माओवादी या नक्षलवादी गटाविषयी उत्तर प्रदेशातील प्रयागराज, वाराणसी, चंदौली, आझमगड आणि देवरिया जिल्ह्यात छापेमारी केली.

एनआयएने मंगळवारी एका नक्षलवादी प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात उत्तर प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये आठ ठिकाणी छापेमारी केली. एनआयएचे पथक मंगळवारी सकाळीच येथे पोहोचले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटेपासून या कारवाईस प्रारंभ झाला. माकप (माओवादी) प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपास करण्यात येत आहे. एनआयएच्या अनेक पथकांनी आठही ठिकाणी एकाच वेळी शोध घेतला. प्रयागराज, वाराणसी, चंदौली, आझमगड आणि देवरिया जिल्ह्यात छापेमारी झाली. ही ठिकाणे संशयितांची निवासस्थाने व कार्यालय परिसर आहेत. यातूनच नक्षली जाळे वाढवण्याचे काम केले जात होते.
 
वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील कथित विद्यार्थी संघटना भगतसिंग विद्यार्थी मोर्चाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. यासोबतच दोन विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएने विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला असून कागदपत्रांची तपासणी केली आहे.

Powered By Sangraha 9.0