सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर! पगार, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ होणार

05 Sep 2023 15:06:11
Government Servant Dearness Allowance Hike

मुंबई :
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ होणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली असली तरी याचा फायदा पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली असली तरी याचा फायदा पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्हीही पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल तर लवकरच तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे.

तसेच, सरकार लवकरच सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना डीए वाढीची भेट देऊ शकते. जानेवारी ते जुलै २०२३ चा महागाई भत्ता लवकरच जाहीर होणार आहे. यावेळीही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात येणार असून सरकारच्या घोषणेनंतर तो ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सध्या महागाई भत्ता ४२ टक्के आहे.



Powered By Sangraha 9.0