अ हिंदू इन ऑक्सफर्ड पुस्तक प्रकाशन सोहळा

04 Sep 2023 18:28:50

oxford hindu 
 
मुंबई : संवाद माध्यम सेवा, पांचजन्य फाउंडेशन, स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे व न्यूज भारती सहआयोजित अ हिंदू इन ऑक्सफर्ड पुस्तकाचे प्रकाशन स्वा. वीर सावरकर अध्यासन केंद्र येथे प्रमुख अतिथी लेखिका शेफाली वैद्य यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यावेळी पुस्तकाच्या लेखिकरश्मी सामंत तसेच अध्यक्ष प्रदीप रावत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
 
ऑक्सफर्ड विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची पहिली हिंदू महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती, पण त्यांना काही दिवसातच राजीनामा द्यायला भाग पाडलं. यामागची करणे काय ते या पुस्तकात उलगडून सांगितले आहे. याच विषयावर रश्मी यांच्याशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी https://forms.gle/QBumFLR4mpqWM8x69 या लिंक वर क्लिक करून आपला विनामूल्य प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0