मुंबई : कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडुन अटकेपासुन तुर्तास दिलासा मिळाला आहे. यापूर्वी किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई हायकोर्टाने पेडणेकरांना तुर्तास दिलासा जरी दिला असला तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅग्ज खरेदीतही घोटाळा झाला होता. करोनाकाळात महापालिकेची १३ जम्बो करोना केंद्रे, २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ३० रुग्णालयांच्या माध्यमातून कथित १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचाही संशय असून, या प्रकरणाचा ईडीकडूनही तपास करण्यात येत आहे. 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती.