हिंदू धर्माचा अपमान करण्याचेच काँग्रेसचे धोरण – भाजपची टिका

04 Sep 2023 21:33:39
Dharmendra Pradhan on Udayanidhi Stalin

नवी दिल्ली :
सनातन हिंदू धर्मास शिव्या देणे, हाच एकमेव अजेंडा विरोधी पक्षांच्या घमंडिया आघाडीचा असल्याची टिका केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केली आहे.

द्रमुक नेते उदयनिधी स्टालिन यांनी हिंदू धर्म नष्ट करण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपने द्रमुकसह विरोधी पक्षांच्या आएनडीआय आघाडीवर टिका केली आहे. केद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पत्रकारपरिषदेत म्हणाले, हे उत्स्फूर्त किंवा अचानक घडलेले नाही. उदयनिधी स्टॅलिन यांनी एका परिसंवादात म्हटले आहे. त्याआधी घमंडिया आघाडीची बैठक झाली. त्यात त्यांना समन्वयक आणि नेता ठरवता आला नाही, मात्र सनातन हिंदू धर्माचा अवमान करण्याचे धोरण या बैठकीत ठरविण्यात आले असल्याचे प्रधान म्हणाले.

कधी उदयनिधी, कधी कार्ती चिदंबरम, कधी प्रियंका खरगे, कधी बिहारचे शिक्षणमंत्री, कधी अखिलेश यादव यांचे प्रमुख नेते स्वामी प्रसाद मौर्य तर कधी केजरीवालांचे नेते गौतम, या सर्वांनी वेगवेगळ्या वेळी एका योजनेखाली हिंदू धर्माचा अवमान करण्याचे धोरण आखले आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते वेणुगोपाल यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस सर्व धर्मांच्या समानतेवर विश्वास ठेवते, पण काँग्रेस पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आदर करतो. त्यामुळे सनातन हिंदू धर्माचा अवमान करणे हेच काँग्रेस आणि घमंडिया आघाडीचे धोरण आहे का, असा सवालही प्रधान यांनी यावेळी विचारला.


Powered By Sangraha 9.0