जन्माष्टमीनिमित्त बाजारपेठांना साज!

    04-Sep-2023
Total Views |

janmashtmi 1


मुंबई :
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील महत्त्वाचा सण आहे. या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला, असे मानले जाते. म्हणून या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे जन्माष्टमीनिमित्त बाजारांमध्ये सजावटीच्या वस्तू पाहायला मिळतात. यंदाही बाजारांमध्ये विविध आकर्षक सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत.

मुंबईतील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले दादर मार्केट अनेकांच्या आवडीचे ठिकाण आहे. तेथे कृत्रिमरित्या बनवलेल्या रंगेबीरंगी फुलांच्या माळा, मोरपीस, मुकुट यांसह जन्माष्टमीनिमित्त लहान मुलांसाठी आकर्षक पारंपरिक पोशाख बाजारात चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांचेही लक्ष वेधून घेत आहे. मुंबईकरांसह राज्यातील विविध भागांतील नागरिकांच्या गर्दीमुळे दादर मार्केट भरून आल्यासारखे चित्र आहे.
 
वेगवेगळ्या प्रकारचे बाळकृष्णाचे पाळणेदेखील आहेत; लाकडी, स्टीलचे, गोल्डन, सजवलेले आदी प्रकारचे पाळणे आहेत. लहान मोत्यांच्या माळी, बाळकृष्णाचे रंगीबेरंगी वस्त्रे, आकर्षक अलंकार तसेच पुजेला लागणारे इतर सामान योग्य किंमतीत आहे. बाळकृष्णाच्या पितळ आणि पंचधातूंपासून बनवलेल्या मुर्त्याही अनेक दुकानात आहेत.
याशिवाय लहान मुलांचे पारंपरिक कृष्णाच्या रुपातील वस्त्रे, अलंकारही बाजारत स्वत दरात उपलब्ध आसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे.