वसंत खैरनार यांना ग्रंथोत्तेजक पुरस्कार

30 Sep 2023 13:49:19

dilipraj prakashan 
 
मुंबई : दिलीपराज प्रकाशनातर्फे देण्यात येणारा ‘दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ ग्रंथ वितरक वसंत खैरनार यांना जाहीर झाला आहे. दिलीपराज प्रकाशनाच्या ५२व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
यावेळी यंदाचा बालसाहित्यासाठीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाल्याबद्दल दिलीपराज प्रकाशनाचे लेखक एकनाथ आव्हाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या ‘प्रवाह’ आणि ‘साक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याप्रसंगी लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.
Powered By Sangraha 9.0