मराठी रंगभूमी पुणे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगीत नाट्य महोत्सव

    30-Sep-2023
Total Views |
 
pune
 
मुंबई : ‘मराठी रंगभूमी पुणे’ या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून सुरु होणार हा महोत्सव ३ दिवस चालणार आहे. दुपारी ४.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाषटन होत आहे. त्यानंतर ‘संगीत सुवर्णतुला’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
 
रविवारी दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘संगीत सौभद्र’ हे नाटक सादर होणार आहे. महोत्सवाची सांगता सोमवारी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी ज्येष्ठ कलाकार संजय देशपांडे आणि युवा कलावंत रोहन भडसावळे यांचा गौरव केला जाणार आहे. त्यानंतर ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.