पॅसेंजर रेल्वेचे इंजिन अचानक वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण!

    30-Sep-2023
Total Views |
engine-of-mumbai-ahmedabad-passenger-train-got-separated-from-coaches

मुंबई
: मुंबई - अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीबाबात दुपारी दोन वाजता एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन सुटून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. मात्र या घटनेत सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पंरतु या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तसेच या घटनेमुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प देखील झाली.

मुळात दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे गाडी वैतरणा स्थानकातून सुटणार होती. त्यावेळी रेल्वेच्या डब्यांना जोडलेले इंजिन अचानक वेगळे होऊन पुढे गेले. यामुळे इंजिनपासून वेगळे झालेल्या प्रवाशांना झटका बसला आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं सावट पसरलं. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र मोटरमनच्या निदर्शनास येताच त्याने लगेचच रेल्वे इंजिन थांबवले.