_202309301730509259_H@@IGHT_392_W@@IDTH_696.jpg)
नवी दिल्ली : आशियाई क्रीडास्पर्धेत टेनिस मिश्र दुहेरी प्रकारात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीबद्दल रुतुजा भोसले म्हणाली, रोहन बोपण्णा यांच्या साथीने रुतुजा भोसले चीनच्या हांगझाऊ येथील १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत टेनिस मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर रुतुजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या खेळीनंतर रुतुजाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती म्हणाली. इतक्या प्रचंड लोकांसमोर खेळण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. तसेच, या सामन्यात मॅच पॉइंटवर विचार करत असताना हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ठरावा, असे वाटले होते आणि त्यासाठी वेळदेखील घेतला होता असेही सुवर्णपदक विजेती टेनिसपटू रुतुजा भोसले म्हणाली.
चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामगिरी करत टेनिस मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. टेनिस मिश्र दुहेरीकत भारताच्या रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी पहिल्या मानांकित चायनीज तैपेईच्या लियांग एन शुओ आणि त्सुंग हाओ हुआंग यांचा २-६, ६-३, १०-४ (सुपर टायब्रेक) अशा फरकाने ऐतिहासिक कामगिरी करत टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे.