मुंबई : 'टाटा मूलभूत संशोधन संस्थे'तंर्गत रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. तसेच, या संस्थेतील एकूण १४ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
दरम्यान, या पदभरती अंतर्गत ‘लिपिक प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी‘ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख १६ आणि २१ ऑक्टोबर २०२३ (पदांनुसार) आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेमधील भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.