'माझं कुटूंब माझी जबाबदारी'चा खरा अर्थ उघड! सुजित पाटकरवर ईडीचा मोठा ठपका!

30 Sep 2023 11:33:34

sujit patkar 
 
 
मुंबई : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
 
 
या संपूर्ण प्रकरणावर भाजप मुंबईच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विट करण्यात आले आहे. "राजकीय हितसंबंधातूनच व्यावसायिक सुजित पाटकर याला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले... अडीच वर्षांच्या काळात फक्त वसुली ,वाझेगिरी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी!" असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
 
कंपनीच्या भागीदारांनी BMC अधिकारी आणि इतर लोकांमध्ये ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने वाटप केले होते. हे पैसे सोने, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात देण्यात आले. ईडीने दावा केला आहे की, दहिसर केंद्रात केवळ ५० टक्के कर्मचारी ड्युटीवर होते.
 
वरळी आणि दहिसर या दोन केंद्रांचे कंत्राट २०२० मध्ये या फर्मला देण्यात आले होते. कंपनीच्या चार भागीदारांनी मिळून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे. या चार जणांमध्ये संजय शहा आणि राजीव साळुंखे यांच्याशिवाय सुजित पाटकर, हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. कर्मचारी अरविंद सिंग आणि दहिसर केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे हे संशयाच्या भोवऱ्यात आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0