मुंबई : तृप्ती देवरुखकर मराठी असल्यामुळे त्यांना मुलुंडमध्ये जागा देण्यास नाकार दिला असल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी रेखटलेल्या व्यंगचित्रात तामिळ पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिला चांगल्या साडीत उभ्या आहेत. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला थिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र ट्विटरवर शेअर करत मनसेनं म्हटलं आहे की, “राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं… आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस” असं ट्विट करण्यात आलं आहे.