मुंबई : पनवेल महापालिकेतंर्गत भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेतील "वैद्यकीय अधिकारी" पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
तसेच, महापालिकेतील भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे. या पदाकरिता दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.
सदर पदभरतीकरिता होणाऱ्या मुलाखतीचा पत्ता –
पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६