मुंबई उच्च न्यायालयात 'जिल्हा न्यायाधीश' पदासाठी भरती

    30-Sep-2023
Total Views |
Mumbai High Court Recruitment 2023

मुंबई :
मुंबई उच्च न्यायालय येथे रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील 'जिल्हा न्यायाधीश' पदाच्या एकूण ०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयातील 'जिल्हा न्यायाधीश' पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याभरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची दि, २० ऑक्टोबर २०२३ आहे. स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.