नवी दिल्ली : भारताच्या (स्क्वॉश) पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले. भारतीय संघाने अंतिम लढतीत पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, भारताच्या अभय सिंगने स्क्वॉश पुरुष सांघिक फायनलच्या ३ सामन्यात पाकिस्तानच्या जमान नूरचा ११-७, ९-११, ७-११, ११-९, १२-१० असा पराभव केला.
दरम्यान, भारतीय संघातील सौरव घोषालने याआधी मुहम्मद असीम खानला पराभूत केले होते तर महेश माणगावकरने पहिल्या सामन्यात नासिर इक्बालला हरवले होते. एशियन गेम्स २०२२ च्या स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.
तसेच, २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉशमध्ये हे पदक जिंकले आहे. भारतासाठी १८ वर्षीय अभय सिंगने अंतिम फेरीतील तणावपूर्ण परिस्थितीत चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारताने स्क्वॉशमध्ये मोठे यश मिळवले आहे. आतापर्यंत यास्पर्धेत भारताने ३६ पदके जिंकली असून त्यात १० सुवर्ण, १३ रौप्य तर १३ कांस्यपदकांचा समावेश आहे.