मुंबईकरांनो फिरायला जाताय! मध्य रेल्वेवर ३८ तासांचा मेगाब्लॉक

29 Sep 2023 22:29:36
Megablock On Central Railway On Saturday

मुंबई :
शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून सोमवार दिनांक २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत अर्थात ३८ तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेलसह दरम्यान अप आणि डाउन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची लोकल ही रात्री ९.०२ वाजता सुटणार आहे.

ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर बेलापूर आणि पनवेल दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नसून हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांपर्यंत शॉर्ट टर्मिनेट/ओरीजनेट करण्यात येणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ही ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यान धावणार आहे. त्याचबरोबर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सीएसएमटीकरिता शनिवारी रात्री १०.३५ वाजता सुटेल.

त्याचप्रमाणे ब्लॉकपूर्वी ट्रान्स-हार्बर मार्गावरून पनवेलकरिता ठाण्याहून रात्री ९.३६ वाजता शेवटची लोकल सुटेल आणि पनवेलहून ठाण्याकरिता रात्री ९.२० वाजता शेवटची लोकल सुटेल. तसेच ब्लॉकनंतर अर्थात २ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी वरून पनवेल करिता पहिली लोकल दुपारी १२.०८ वाजता सुटेल आणि पानवेलवरून सीएसएमटी करिता पहिली लोकल १.३७ वाजता सुटेल. तर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली लोकल १.२४ वाजता ठाण्याहून सुटेल आणि पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल २.०१ वाजता सुटेल.


Powered By Sangraha 9.0