Asian Games 2022 : बॅडमिंटनमध्ये पुरुष संघाचे पदक निश्चित!

29 Sep 2023 17:15:57
Indian Badminton Team In Asian Games 2022

नवी दिल्ली :
१९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने आतापर्यंत चमकदार कामगिरीत विविध क्रीडाप्रकारांत पदकांची लयलूट करत आहे. दरम्यान, बॅडमिंटनमधील भारताचे पदक निश्चित झाले असून लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि मंजुनाथ मिथन यांच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ संघाचा ३-० असा पराभव केला.

या तिन्ही भारतीय खेळाडूंनी आपले सामने सरळ गेममध्ये २-० ने जिंकले. या कामगिरीसह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. एशियाडमधील बॅडमिंटनमध्ये, उपांत्य फेरीसाठी पात्र झाल्यानंतर कांस्यपदकाचा सामना खेळला गेला नाही, तर उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना कांस्यपदक दिले जाते. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये पुरुष संघाचे पदक निश्चित झाले आहे.


Powered By Sangraha 9.0