‘हॅरी पॉटर’मधील ‘डंबलडोर’ यांचे निधन

29 Sep 2023 11:20:07

dumboldore 
 
‘हॅरी पॉटर’ या हॉलिवूड चित्रपट सीरीजचा देशात किंवा जगात चाहता नसेल असे शक्यच नाही. हॅरी पॉटर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते जादूई शहर, तिथे घडणाऱ्या विचित्र घटना, प्लॅटफॉर्म नं. ९ ३/४ सारखी अनोखी कल्पना. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अनेक कलाकारांचे निधन झाले. आता यातील आणखी एका महत्वाच्या कलाकाराचे निधन झाले आहे. ‘डंबलडोर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते मायकल गॅम्बॉन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून ते एका दुर्धर आजाराने ग्रस्त होते. या आजारानेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
 
मायकल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. परंतु, विविधांगी भूमिका साकारणाऱ्या मायकल यांची ‘हॅरी पॉटर’मधील ‘हेडमास्टर डंबलडोअर’ ही भूमिका प्रचंड गाजली. या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. मायकल यांनी हॅरी पॉटरच्या आठ चित्रपटांपैकी सहा चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.
Powered By Sangraha 9.0