विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर

27 Sep 2023 19:54:08
Maharashtra Legislative Speaker Rahul Narvekar Ghana Tour

मुंबई :
घाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ६६ राष्ट्रकुल संसदीय परिषदेला जगभरातील संसदीय देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. या परिषदेला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहणार आहेत.

यासाठी नार्वेकर ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत घाना दौऱ्यावर जाणार आहेत. या परिषदेला जगभरातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख सामील होणार आहेत.


Powered By Sangraha 9.0