खलिस्तान्यांच्या विरोधात NIA ची धडक कारवाई!

27 Sep 2023 12:31:53
nia 
 
मुंबई : भारतीय सुरक्षा यंत्रणा खलिस्तान समर्थकांविरोधात कारवाई करत आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी सुरू आहे. आज एनआयएने उत्तराखंडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी केली. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत-कॅनडामध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडाने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आहे.
 
उत्तराखंडची राजधानी डेहराडून तसेच बाजपूर आणि उधम सिंग नगरमध्ये एनआयएची छापेमारी सुरू आहे. यासोबतच एनआयएने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली-एनसीआरमध्ये छापे टाकले आहेत. ड्रग्ज विक्रेते आणि दहशतवादी यांच्यातील संबंध संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने छापे टाकले जात आहेत.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनमधील क्लेमेंट टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी संकुलात छापा टाकण्यात आला आहे. यासोबतच उधम सिंह नगरमधील बाजपूर भागातील एका गन हाऊसवर छापा टाकून शस्त्रास्त्रांची तपासणी केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0