घोडेस्वारीत भारताची ऐतिहासिक कामगिरी; तब्बल चार दशकांनंतर सुवर्ण!

27 Sep 2023 16:24:56
Indian equestrian Team Won Gold In Asian Games

मुंबई :
चीनच्या हांगझाऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून चमकदार कामगिरी केली जात आहे. भारताने घोडेस्वारी या क्रीडाप्रकारात अनेक दशकांनंतर घोडेस्वारी (equestrian Team) टीमने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या हृदय छेडा, अनुष अग्रवाला, सुदिप्ती हजेला आणि दिव्यक्रित सिंग यांनी अतुलनीय कौशल्य, सांघिक कार्य दाखवून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.

दरम्यान, १९८२ च्या नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अखेरचे अश्वारूढ सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता या खेळाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ड्रेसेज स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळवले आहे. २०९.२०५ टक्के गुणांस भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले तर २०४.८२२ टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तर हाँगकाँगने २०४.८५२ गुणांसह कांस्यपदक पटकावले.



Powered By Sangraha 9.0