कुत्र्यासाठी मैदान मोकळं करणाऱ्या 'आयएएस'ला सक्तीची निवृत्ती!

27 Sep 2023 19:12:40
कुत्र्यासाठी मैदान रिकामे करणाऱ्या 'आयएएस'ला सक्तीची निवृत्ती!

नवी दिल्ली :
कुत्र्यासाठी मैदाने रिकामे करणाऱ्या आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली आहे. गेल्या वर्षी रिंकू यांनी आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी दिल्ली येथील त्यागराज मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करण्यात आला आहे. ही घटना समोर येताच गेल्या वर्षी सरकारने तातडीने कारवाई करत दुग्गा आणि त्यांचे पती आयएएस अधिकारी संजीव खिरयार यांची नवी दिल्लीतून बाहेर बदली केली होती.

दरम्यान, गेल्या वर्षी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणारे हे स्टेडियम २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान बांधण्यात आले होते. व्हिडिओमध्ये आयएएस अधिकारी दाम्पत्य कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये फिरताना दिसत आहे. सोशल मीडियातूनही या दाम्पत्यावर टीका करण्यात आली होती.

यानंतर दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात आणि खिरवारची लडाखमध्ये बदली करण्यात आली. आता दुग्गा यांना बळजबरीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. त्यावेळी रिंकू दुग्गा यांचे पती खिरवार हे दिल्लीचे प्रधान सचिव (महसूल) होते.



Powered By Sangraha 9.0