मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी!

27 Sep 2023 17:06:23
Eid-e-Milad Public Holiday On 29th September

मुंबई :
उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी असल्याकारणाने राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबरऐवजी दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यावर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन दि. २९ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सणांच्या दिवशी राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.


Powered By Sangraha 9.0