Asian Games 2022 : बॉक्सर निकहत झरीन उपांत्यपूर्व फेरीत!

27 Sep 2023 17:53:02
Boxer Nikhat Zareen Enters Quarter Final

मुंबई :
१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२, हांगझाऊ येथील भारताची अव्वल बॉक्सर निकहत झरीन हिने बॉक्सिंगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. दरम्यान, भारताची दोन वेळची विश्वविजेती बॉक्सर निकहत झरीनने महिलांच्या ५० किलो गटात व्हिएतनामच्या थि ताम गुयेनवर ५-० असा विजय मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

तसेच, १६ व्या फेरीत निकहत झरीनचा सामना दक्षिण कोरियाच्या चोरॉंग बाकशी होईल. ५० किलो वजनी गटात विश्वविजेती असूनही, पहिल्या फेरीत बाय न मिळालेल्या चार बॉक्सरपैकी निकहत एक होता. आता १६ च्या फेरीत निकहतचा सामना दक्षिण कोरियाच्या चोरोंग बाकशी होईल, तर प्रीतीचा सामना कझाकिस्तानची बॉक्सर आणि तीन वेळा जागतिक पदक विजेती झायना शेरबेकोवाशी होईल.


Powered By Sangraha 9.0