ASIAN GAMES 2022 : नेमबाज अनंत याने जिंकले रौप्यपदक!

27 Sep 2023 16:48:25
Anant Nakura Won Silver Medal In ASIAN GAMES 2022

मुंबई :
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाज अनंत जीत सिंगने पुरुषांच्या शॉटगन स्कीटमध्ये रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या शॉटगन स्कीट या क्रीडाप्रकारात भारताच्या अनंत जीत सिंग याने खेळताना ६० पैकी ५८ लक्ष्ये मारली. त्यानुसार, अनंत जीत सिंगने ५८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, या स्पर्धेत कुवेतच्या अब्दुल्ला अलराशिदी ६० गुण सुवर्णपदक तर कतारच्या नासेर अल-अटिया ४६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच, कुवेतच्या अब्दुल्ला अलराशिदीने २०१८ मध्ये भारताच्या अंगद बाजवाने बनवलेल्या ६० गुणांच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली.



Powered By Sangraha 9.0