राजेश शिरवडकर यांना मातृशोक

26 Sep 2023 13:36:47

rajesh shirwadkar mother



मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि दक्षिण मध्य मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या मातोश्री अनुसया एकनाथ शिरवडकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या मागील काही काळापासून प्रदीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी वयाच्या ६९ व्या वर्षी अनुसया शिरवडकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र राजेश शिरवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सून व आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.

सोमवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. अनुसया शिरवडकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून शिरवडकर कुटुंबप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0