मुंबई : अभिनेत्री म्हणून तर कतरिना कैफ प्रसिद्धीच्या शिखरावर आहेच आता अजून एक नवी झेप घेऊन ती एका मोठ्या ब्रँड चा चेहरा ठरली आहे. पहिली भारतीय महिला म्हणून ती या ब्रँडचा चेहरा ठरली. तिने पुन्हा एकदा एक महत्त्वाची वाटचाल केली आहे ज्याने फॅशन आणि मनोरंजनाच्या जगामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे. तिला जपानी जागतिक फॅशन दिग्गज UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून लाँच करण्यात आल असून संपूर्ण भारतीयासाठी ही कौतुकाची बाब ठरली आहे.
UNIQLO ची नवनियुक्त ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कतरिना कैफ आपली अनोखी छाप पाडणार आहे. या असोसिएशनबद्दल विचारले असताना ती म्हणाली, " मी UNIQLO सोबतच्या माझ्या भागीदारीबद्दल खूप उत्सुक आहे. मला जपानी संस्कृती आणि त्यांच्या रचना सौंदर्यशास्त्राबद्दल नेहमीच आकर्षण होत आणि UNIQLO हा माझ्या जीवनावश्यक वस्तूंचा ब्रँड कमालीचा आहे”.