हिंद - प्रशांत क्षेत्रासाठी शांततापूर्ण समाधानावर भारताचा भर – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

26 Sep 2023 17:48:47

manoj pande

नवी दिल्ली :
अलिकडच्या वर्षांत हिंद - प्रशांत महासागर क्षेत्राने भू - रणनीतीमध्ये मध्यवर्ती स्थान व्यापले आहे. त्याचे महत्त्व आजच्या जगाच्या राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील उदयोन्मुख गतिशीलतेचे प्रतिबिंब आहे. असे प्रतिपादन हिंद प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले आहे.

लष्करप्रमुख म्हणाले की, जरी विविध देशांचे प्रयत्न मुक्त हिंद - प्रशांतच्या दिशेने वाटचाल करत असले तरी वाद आणि स्पर्धांचे प्रकटीकरण आपण पाहत आहोत. आम्हाला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रदेशातील सर्व भागधारकांना सकारात्मकतेने गुंतवून ठेवण्याची भारताची वचनबद्धता अटल आणि टिकाऊ आहे. हिंद - प्रशांत क्षेत्रासाठी भारताचा दृष्टिकोन विवादांचे शांततापूर्ण निराकरण, बळाचा वापर टाळणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन यावर भर देतो, असेही ते म्हणाले.
 
हिंद - प्रशांत क्षेत्राच्या महत्त्वावर भर देताना जनरल पांडे म्हणाले की, हा प्रदेश केवळ राष्ट्रांचा समुह नाही, यामध्ये परस्परावलंबनाचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे विश्वास निर्माण करणे आणि सहकार्य मजबूत करणे हे भारताचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0