शरद पवारांना पुन्हा धक्का!

26 Sep 2023 19:56:19
Garware Health Club election
मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर अस्वस्थ असणाऱ्या शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गरवारे हेल्थ क्लबच्या निवडणुकात शरद पवार यांच्या पॅनेलचा पराभव झालेला आहे. डायनॅमिक डेव्हलपमेंट समुहाने शरद पवार गटाचा पराभव करत, धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत पवार गटाचे १३ सदस्य होते. त्या १३ ही सदस्यांचा दारुण पराभव झाला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबत संलग्नित हा क्लब गरवारे क्लब हा नामांकीत क्लब आहे. या क्लबचे दहा हजाराहून अधिक सदस्य मुंबईत आहेत. गेल्या काही काळापासून शरद पवार गटाचे आणि राज के पुरोहित यांची क्लब वर एकहाती वर्चस्व होते.पण आता शरद पवार गटाचा पराभव करत. डायनॅमिक डेव्हलपमेंट समुहाने विजय मिळवला आहे. शरद पवार गटाचे दिलीप शाह (अध्यक्ष), राज के पुरोहित (उपाध्यक्ष) यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून डायनॅमिक डेव्हलपमेंट समुहाचे मनिष अजमेरा (अध्यक्ष), सायरस गोलीबार (उपाध्यक्ष) यांचा विजय झालेला आहे.


Powered By Sangraha 9.0