फिनटेक बूस्टसाठी डीएलआयची सिडबीशी भागीदारी

    26-Sep-2023
Total Views |
Fintech
 
 
फिनटेक बूस्टसाठी डीएलआयची सिडबीशी भागीदारी
 
 
मुंबई: Small Industry Development Bank of India ( सिडबी) ने शनिवारी Digital Lender Association of India (DLAI) बरोबर फिनटेक क्षेत्रातील उन्नतीसाठी भागीदारीचा सामंजस्य करार (MOU) केला आहे.
 
 
'डिजिटल लेंडिग पार्टनरशिप' अंतर्गत सिडबीने काही फिनटेक मधील प्रामाण्य निर्मितीसाठी हा करार केला आहे. बँका व Lending Service Provider ( LSP) यांच्यातील व्यवहार सुलभ व जलदगतीने होण्यासाठी MOU करार केला आहे. या व्यतिरिक्त सिडबी पात्र ठरणाऱ्या DLAI च्या एनबीएफसी सदस्यांना विविध स्त्रोत मिळवण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कामाची नेमणूक व छाननी करण्यासाठी देखील सिडबी मदत करणार आहे.
 
 
यावर व्यक्त होताना, ' डिजिटल कर्जाचा जलद अवलंब करणे सुलभ करण्यासाठी मानक प्रोटोकॉल, ग्राहक संरक्षण,तक्रार निवारण यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर उद्योगासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे SIDBI चे सीएमडी शिवसुब्रमण्यम रामन म्हणाले. 
 
 
आपल्या व्यावसायिक धोरणाचा एक भाग म्हणून, सिडबी थेट सूक्ष्म उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि भागीदारी के.ली डीएलएआय सदस्यांद्वारे आपली क्रेडिट उत्पादने ऑफर करण्याचा शोध घेईल' असेही ते यापुढे म्हणाले.
 
 
करारानुसार, SIDBI आणि DLAI त्यांच्या "प्रयास" योजनेसाठी अनौपचारिक उपक्रम,सह-कर्ज, GST सहाय, एक्सप्रेस कर्ज,हरित वित्तपुरवठा आणि इतर थेट क्रेडिट योजनांसाठी भागीदारी शोधतील.
 
 
"यावर बोलताना ही भागीदारी एमएसएमई क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी भारताच्या फिनटेक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते.' असे रामन यावेळी म्हणाले.