मृण्मयी देशपांडे ‘मुंबई डायरिज’ वेब मालिकेच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा झळकणार

25 Sep 2023 17:25:47

mrunmayee deshpande 
 
 
मुंबई : मराठी कलाकार इतर भाषिक व्यासपीठांवर यश मिळवताना दिसत आहेतच. गिरीजा ओक, सई ताम्हणकर, प्रिया बापट या अभिनेत्रींच्या रांगेत आला अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा देखील समावेश झाला आहे. Amazon Prime या ओटीटी वाहिनीवरील 'मुंबई डायरीज' या गाजलेल्या वेब मालिकेच्या दुसऱ्या भागात देखील मृण्मयी प्रमुख भूमिकेत दिसणर आहे. 'मुंबई डायरीज' या वेब मालिकेटा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. त्यातही मृण्यमयीने डॉ. सुजाता आजवलेही भूमिका साकारली होती.
 

mrunmayee 
 
२६/११ चा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरु शकणार नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक लोकं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले होते. कही जखमींना कामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अशा वेळी स्वत:चं घरदार विसरुन डॉक्टरांनी संपूर्ण ताकद त्या जखमींचा जीव वाचवण्यासाठी लावली होती. त्या डॉक्टरांची मानसिक स्थिती काय होती? आणि त्या हॉस्पिटलची अवस्था त्यावेळी काय होती याची सत्य मांडणारी ‘मुंबई डायरीज’ ही वेब मालिका आहे. लवकरच ही वेब मालिका प्रदर्शित होणार आहे. निखील अडवाणी दिग्दर्शित या मालिकेत मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरीसह अनेक कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0