अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'मिशन राणीगंज' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
25-Sep-2023
Total Views |
मुंबई : खाणकामगाराांचा जीव वाचवणाऱ्या खऱ्या जीवनातील हिरोची गोष्ट सांगणारा चित्रपट ‘मिशन राणीगंज’ लवकरच प्रैक्षकांना भेटायला येणार आहे. नुकताच अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मिशन राणीगंज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयने जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारली आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
खाणकामगार जमिनीखाली असलेल्या खोल खाणीत अडकले असतात. अशातच खाणीत पाण्याचा प्रवाहाचा धोका असतो. खाणकामगारांचा जीव धोक्यात असतो. आणि मग यावेळी अक्षय कुमार पुढे सरसावतो. फक्त ४८ तासात अक्षयला खाली असलेल्या कामगारांना बाहेर काढायचं असतं. मग पुढे काय होतं? हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
अक्षय कुमार, परिणीती चोप्रा यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मिशन राणीगंज’ चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे.