जम्मू आणि काश्मिरात विकासाचे नवे पर्व; श्रीनगर ते बालटाल पर्यंतचा बोगदा लवकरच खुला होणार

25 Sep 2023 15:49:00
Srinagar to Baltal Tunnel Open Coming Soon

नवी दिल्ली :
जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटविल्यानंतर मोदी सरकारकडून अनेक विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याच विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंतर्गत दळणवळण सुविधा प्रदान करण्यात येत असून अनेक प्रस्तावित प्रकल्पांना चालना दिली जात आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या माध्यमातून कलम ३७० हटविल्यानंतर ३ वर्षात ४ बोगदे बांधण्यात आले असून या बोगद्यांचा फायदा असा आहे की पर्यटकांना कोणत्याही हंगामात डोंगराळ भागात जाणे शक्य झाले आहे. तसेच, या रस्ते महामार्गांमुळे येथील पर्यटनास चालना मिळत आहे.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

याच विकासपर्वातंर्गत जेड मोड बोगद्याचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. या बांधकामात जोजिला फेज १ चे काम राहिले असून ते पूर्ण करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे श्रीनगर ते बालटालपर्यंतचे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे.

अमरनाथ यात्रेकरिता याचा फायदा होणार असून श्रीनगर ते अमरनाथ यात्रा दरम्यान बेस कँप बालटालपर्यंत ९३ किमीचे अंतर आहे. तसेच, हे अंतर पार करण्यासाठी थंडीच्या दिवसात कारने ४ तास लागतात. परंतु, जेड मोड बोगद्यामुळे हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

जोजिला : दोन बोगदे आणि चार पूल तयार

जोजिला बोगद्याच्या मेगा प्रकल्पाचे अधिकारी यांनी सांगितले की, एकुण १७ किमी लांब आणि ११,५७८ फूट उंचीवर असणाऱ्या या प्रकल्पाच्या फेज १ चे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. यात १८०० कोटी रुपयांत २.५ किमीचे बोगदे नीलग्राथ १ आणि नीलग्राथ २ तयार असून तीन मोठे पूल आणि १ लहान पूल तयार करण्यात आले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे प्रोत्साहित होऊन प्रशासन १५ नोव्हेंबरपासून निर्माणाधीन झेड मोड बोगदाचा समांतर बोगदा (एस्केप बोगदा) उघडणार आहे. झेड मोड बोगड्यातून सोनमर्गचे सौंदर्य पर्यटकांना प्रथमच पाहता येणार आहे. तुम्ही बर्फावर खेळण्याचा आनंद घेऊ शकता.

Powered By Sangraha 9.0