पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग; असा आहे खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरचा इतिहास

25 Sep 2023 18:38:01
 hardipsingh nijjar
 
मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हरदीपसिंग निज्जरच्या विरोधात तयार केलेल्या डॉजियरमध्ये निज्जरच्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली आहे.
 
हरदीपसिंग निज्जर हा कॅनडामध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवण्यात आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवत, असा आरोप या डॉजियरमध्ये करण्यात आला आहे. गुंतला होता. निज्जरने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते आणि देशातील इतर खलिस्तानी समर्थकांशी त्याचे घनिष्ट संबंध होते.
 
निज्जरने पंजाब आणि भारताच्या इतर भागात दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचे पुरावे भारतीय तपास यंत्रणांकडे आहेत. निज्जर हा बंदी घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा (केएफटी) प्रमुख आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. भारतातून बनावट पासपोर्टद्वारे फरार झाल्यानंतर त्यांने कॅनडामध्ये शरण घेतली होती. हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0