NTRO Recruitment 2023 : 'या' पदासाठी आजच अर्ज करा

25 Sep 2023 14:50:33
NTRO Assistant Director Recruitment 2023
 
मुंबई : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था(एनटीआरओ) अंतर्गत रिक्त पदासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "सहाय्यक संचालक" (अॅडमिनिस्ट्रेशन) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एनटीआरओकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांना निश्चित मुदतीच्या आधी अर्ज भरावा लागेल.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!


'एनटीआरओ'मधील भरतीप्रक्रियेद्वारे "सहाय्यक संचालक" (अॅडमिनिस्ट्रेशन) पदाच्या एकूण ३ जागा भरल्या जाणार आहेत. सदर  उमेदवारांनास भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल. तसेच, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इ. तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0