अजितदादांनी केली खडसेंची पोलखोल! खडसेंना फोन केलाच नाही!

25 Sep 2023 14:48:33

Ajit Pawar & Eknath Khadase


मुंबई  :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गटाकडून आपल्याला ऑफर आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता अजित पवारांनी एकनाथ खडसेंची पोलखोल केली आहे.
 
"मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारले होते. तसेच अजित पवारांतर्फे मिटकरींचा फोनही आला होता. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही," असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये," असे विधान केले होते. यावर एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली होती.
 
दरम्यान, अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याविषयी विचारले असता, "मी कुणालाही फोन केला नाही. तसेच मी अमोल मिटकरींच्या मार्फत कशाला कुणाला फोन करेन? मी थेट बोलणारा माणूस आहे. कुणाशी बोलायचं असेल तर मी थेट बोलतो. कुणाच्याही मार्फत बोलत नाही," असे अजित पवार म्हणाले आहेत.

Powered By Sangraha 9.0