चंदीगड : एनआयएने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केली आहे. चंदीगडमधील सेक्टर १५, पन्नूच्या मालमत्तेवर जप्तीशी संबंधित नोटीस चिकटवण्यात आली होती.
अशीच आणखी एक नोटीस पन्नूच्या खानकोट या मूळ गावातील शेतजमिनीवर लावण्यात आली होती. खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांविरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे. दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झालेला असताना एनआयएने ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पन्नूने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली. एका व्हिडिओमध्ये तो म्हणाली, "इंडो-कॅनेडियन हिंदूंनो, तुम्ही तुमची कॅनडा आणि कॅनडाच्या राज्यघटनेशी असलेली निष्ठा नाकारली आहे. त्यामुळे तुम्हाला आता भारतात वापस जावे लागेल"