दादरमधील १५ मजली इमारतीला आग!

23 Sep 2023 15:16:43

fire

मुंबई : दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील १५ मजली रेनट्री नामक इमारतीला २३ सप्टेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन पाटकर असून ते ६० वर्षीय होते.

या घटनेतील इतर जखमी व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Powered By Sangraha 9.0