डोंबिवली स्टेशनवर चित्रपट पाहता येणार!

डोंबिवली, खोपोली,जूचंद्र व इगतपुरी स्थानकांवर प्रयोग

    23-Sep-2023
Total Views |

dombivli


मुंबई:
रेल्वे स्थानकांवर आता सिनेमाही पाहता येणार आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी आता रेल्वेने प्रायोगिक तत्वावर स्थानक परिसरात प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली,जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी रेल्वेने निविदा मागवल्या असून या प्रस्तावित सिने डोममध्ये ग्राहकांसाठी जेवण,नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच नवीन माहितीपट आणि इतर सामग्री चित्रपट प्रदर्शित केले जातील.

सिने डोमचे व्यवस्थापन स्वतःच ऑपरेट करतील. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमची स्थापना, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी लागणारा खर्च परवानाधारकाला करावा लागेल त्यात उभारणीचा खर्च, प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम संबंधित वस्तू, संरक्षा आणि सुरक्षा, आवश्यक सुविधा, केबल टाकणे, विद्युत कनेक्शन, वीज वापर शुल्क, वीज जमा आणि इतर प्रासंगिक खर्च इ. समावेश आहे.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!