MIDC Mumbai Recruitment 2023 : आजच अर्ज करा

23 Sep 2023 17:08:19
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(एमआयडीसी) अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार एमआयडीसी, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!


तसेच, या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. दि. ०२ सप्टेंबर २०२३ पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली असून दि. २५ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. या भरतीद्वारे एमआयडीसी, मुंबई अंतर्गत ८०२ रिक्त जागा भरल्या जातील.

या भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास अर्ज शुल्क भरावा लागेल. अधिसूचनेनुसार, खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १ हजार रुपये तर मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी १०० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे.
 
भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0