वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी; सचिन तेंडुलकरने दिली पंतप्रधान मोदींना जर्सी भेट

23 Sep 2023 15:15:12
Former Cricketer Sachin Tendulkar Gifted Indian Jeresy To the PM

मुंबई : 
उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाली. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट म्हणून दिली. या जर्सीच्या मागे 'नमो' असे लिहिले होते. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, ज्यामध्ये मोठ्या क्षणाचे कौतुक करण्यात आले.

दरम्यान, "पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वाराणसीसाठी पहिल्यांदाच पायाभरणी करत आहेत. राज्यातील प्रत्येक क्रीडाप्रेमींच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचे स्वागत करतो," असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारने स्टेडियमसाठी जमीन संपादनासाठी १२१ कोटी रुपये खर्च केले असून बीसीसीआयकडून स्टेडियमच्या बांधकामासाठी ३३० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच, सदर स्टेडियमचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

यावेळी सचिन तेंडूलकरसह बीसीसीआय सचिव जय शाह, भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज रवी शास्त्री, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर आदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते.




Powered By Sangraha 9.0