'एक देश, एक निवडणूक' समितीची पहिली बैठक संपन्न

23 Sep 2023 18:12:19

One nation one election


नवी दिल्ली :
'एक देश, एक निवडणूकी'साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीकरिता गृहमंत्री अमित शहा, गुलाम नबी आझाद आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
 
'एक देश, एक निवडणूक' समितीच्या या बैठकीमध्ये कामाचा आरखडा कसा तयार करायचा यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या देशात एक देश, एक निवडणूक लागू करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यानिमित्ताने ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंग, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचा समावेश आहे.

Powered By Sangraha 9.0