हिरापन्ना मॉलमध्ये आगीचे तांडव!

22 Sep 2023 16:56:33

HIRAPANNA

मुंबई
: मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे हिरापन्ना मॉलला २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग एल टू प्रकारची असून दुपारी साधारणपणे ३ वाजताच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली होती.
 
हिरा पन्ना मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर अनेक व्यावसायिक गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये काम करणारे तसेच ऑफिस कर्मचारी यात अडकले असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
 
घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ताबडतोब पोहोचले आगीवर नियंत्रण मिळण्याचं काम सुरु आहे. तरी आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Powered By Sangraha 9.0