लालबागच्या पदाधिकाऱ्यांकडून भक्तांना धक्काबुक्की

22 Sep 2023 20:16:03
Lalbaugcha Raja Viral Video
 
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी सर्वदूर ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला रोज हजारो भाविक गर्दी करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना गैरप्रकाराला सामोरे जावे लागले आहे. दर्शनासाठी आलेली गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुकी झाल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पदाधिकाऱ्यांकडून भक्तांना मारहाण करण्यात आल्याची दृश्य व्हायरल व्हिडिओतून समोर आली आहेत.

दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. लालबागचा महिमा आणि दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. लालबागमध्ये पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या या वर्तनाची ही काही पहिली वेळ नाही.

यापूर्वी अनेकदा पदाधिकारी - पोलीस,पदाधिकारी - पत्रकार आणि काही पदाधिकारी - भाविक यांच्यात झालेल्या बाचाबाचीची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत, त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.



Powered By Sangraha 9.0