लडाख पोलिस कॉन्स्टेबल भरतीकरिता अर्जप्रक्रिया सुरू; आजच अर्ज करा

22 Sep 2023 17:10:48
Ladakh Police Constable Recruitment 2023

मुंबई :
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. लडाख पोलिस कॉन्स्टेबल भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, लडाख पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, कार्यकारी, सशस्त्र/IRB, HG/CD/ADRF संवर्गातील कॉन्स्टेबल भरती होणार आहे.

तसेच, लडाख पोलिस कॉन्स्टेबल भरतीकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर दूरसंचार संवर्गातील कॉन्स्टेबल पदांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १०+२ परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दरम्यान, लडाख पोलिसांमध्ये २९८ कॉन्स्टेबलच्या भरतीसा २२ सप्टेंबरपासून सुरू झाली असून विहित पात्रता असलेले इच्छुक उमेदवार १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०५.४५ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतील. अर्जाची फी ५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी अर्ज करताना फक्त ऑनलाइन माध्यमातून भरावी लागेल.
 
लडाख पोलिस कॉन्स्टेबल भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 
Powered By Sangraha 9.0