१९ वर्षाच्या अंतिम पंघालची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

22 Sep 2023 18:29:16

antim panghal


मुंबई : भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघालने युरोपच्या जोआना माल्मग्रेन हिचा पराभव करत भारतीयांची मने जिंकली. १९ वर्षीय पंघाल जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघालने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. अंतिम पंघाल ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली.

सर्बिया येथील बेलग्रेडमध्ये आयोजित जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप (World Wrestlers Championship) स्पर्धेत अंतिम पंघाल हिने जोआना माल्मग्रेन हिला १६-६ अशा गुणांनी मात दिली. गतवर्षी माल्मग्रेन हिने २३ वर्षांखालील युरोपीय चॅम्पियनशिप आणि वरिष्ठ युरोपीय चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत माल्मग्रेनला कांस्य पदकाच्या सामन्यात भारताच्या विनेश फोगाट हिने पराभूत केले होते.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!


Powered By Sangraha 9.0