नाना पाटेकरांना चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते - तनुश्री दत्ता

21 Sep 2023 19:00:18
 
nana and tanushree
 
 
मुंबई : काही दिवसांपासून राखी सावंतचा मुद्दा चर्चेत आहे. आता या वादात अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच राखीच्या नवऱ्यासोबत अर्थात आदिल खानबरोबर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने #MeToo बद्दल बोलत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
 
या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ता हिला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाबद्दल आणि यात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकरांबाबत प्रश्न विचारला असता तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत आपण का बोलत आहेत? त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते. २००८ मध्ये नाना पाटेकरांचं माझ्याबरोबर भांडण झालं होतं, त्यावेळीही त्यांचा चित्रपट चालला नव्हता”. पुढे ती असं देखील म्हणाली की, “पत्रकार त्यांच्या चित्रपटांबाबत तनुश्रीला विचारतील आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळेल. मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही," असंही तनुश्री पुढे म्हणाली.
Powered By Sangraha 9.0